Pune–PCMC Politics: Ajit Pawar attacks Mahesh Landge with corruption allegations, heated political clash erupts in campaign. saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics: 'आम्ही काय बांगड्या घातल्यात का?' महेश लांडगे-अजित पवारांची पुणे-पिंपरीत कुस्ती

Pune Corporation Election: पुणे आणि पिंपरी चिंचवडकीमधील राजकारणा चांगलेच तापले आहे. भ्रष्टाचारावरून अजित पवार यांनी भाजप नेते महेश लांडगे यांना टार्गेट केलं. त्यानंतर संतप्त महेश लांडगे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्याने राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

Bharat Mohalkar

  • पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रचारात अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा राजकीय संघर्ष

  • अजित पवारांनी महेश लांडगेंना ‘भ्रष्टाचाराचा आका’ म्हणत गंभीर आरोप

  • महिलांचा अवमान केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला, त्यामुळे वाद अधिक चिघळला

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारात महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये कुस्ती रंगलीय. अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका, असा उल्लेख केल्याने संतापलेल्या महेश लांडगेंनी थेट अरे तुरे ची भाषा वापरलीय.

दुसरीकडे लांडगेंनी हातात बांगड्या घातल्या नाहीत, असं म्हणून महिलांचा अवमान केल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. खरं तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलीय.मात्र महायुतीत असतानाही अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे थेट आरोप करत भाजपला चांगलंच घेरलंय.

25 वर्षांची राष्ट्रवादीची सत्ता भेदून 2015 मध्ये भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा गड जिंकला. आता तोच गड ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसलीय. त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय. मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीनंतरही पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर भाजपला कौल देणार की अजित पवार गमावलेला गड पुन्हा जिंकणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT