Pankaja Munde Saam tv
मुंबई/पुणे

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Sanjay Raut On Pankaja Munde: नारीशक्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपने मुंबई-पुणे येथे जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चावरून संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला. 'महिलांची एवढीच काळीजी असेल तर महिला मुख्यमंत्री करा', असं ते म्हणाले.

Priya More

Summary -

  • संजय राऊत यांचे पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान

  • नारीशक्ती वंदन विधेयकावरून सरकारवर टीका

  • संजय राऊत यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मोदी सरकार आणू पाहत असलेले नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. बहुमताअभावी हे महिला विधेयक आणण्यात मोदी सरकारला अपयश आले. याच विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मोदी सरकार आणि फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. 'महिलांची एवढीच काळीजी असेल तर महिला मुख्यमंत्री करा. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावे.', असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांच्याया विधानामुळे राजकारणात खळबळ उडाली.

नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले होते. भाजपने मुंबई आणि पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना नारीशक्ती वंदन विधेयकाबाबत म्हणाले की, 'नारीशक्ती वंदन हे ढोंग आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला बसवा. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा. पंतप्रधानपदी महिला नेत्याला बसवा तरच नारीशक्तीला बळ मिळेल.'

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'भाजप सरकार आल्यापासून या देशाचा नरक झाला. या देशातील १४० कोटी जनता मोदी यांनी नरकात ढकलली. माय फ्रेंड डोनाल्ड यांनी कटू सत्य मांडलं आहे. मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नरक नसून नंदनवन आहे हे जाहीर करावं.'

संजय राऊत विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली नाही. हर्षवर्धन सकपाळ मातोश्रीवर आले. भविष्यातील अनेक घडामोडी, लोकसभा, निवडणुका महाविकास आघाडी म्हणून चर्चा झाली. विधान परिषदेसाठी त्यांची भूमिका आहे की तिथे उद्धव ठाकरे यांनी जावं. माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी दिलासा देणार आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच विधिमंडळात नेतृत्व करावं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT