Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: 'मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण; राष्ट्रपती राजवट लागू करा...' संजय राऊतांचा पुन्हा घणाघात

Sanjay Raut News: महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझे देशाच्या गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि कोसळली आहे, असे राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. ११ फेब्रुवारी २०२४

Sanjay Raut Press Conference:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार, हत्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझे देशाच्या गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि कोसळली आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था यावर लक्ष घाला. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना राज्य सांभाळण कठीण झालं आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा," अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

"काल मातोश्रीवर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, वर्षा गायकवाड आल्या होत्या. त्यावेळी देखील चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील चर्चा झाली, त्यामुळे नक्कीच आम्ही देखील ठोस पाऊले उचलू आणि या सरकारच्या झुंडशाहीला जनतेचे आव्हान देऊ," असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार

"आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात याविरुद्ध आंदोलने करु. महाराष्ट्रातील गुन्हेगारीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरु, जनता गप्प बसणार नाही. यासंबंधी महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे, कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे, याबद्दल निर्णय घेऊ," असे संजय राऊत यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT