Maharashtra Politics :  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवार गटामुळे भाजपला गळती? दादांमुळे आमदारकीची संधी हुकणार? पाहा व्हिडिओ

Ajit pawar News : भाजपच्या 25-30 नेत्यांना शिंदे गट आणि अजित पवार गटामुळे उमेदवारीवर पाणी सोडावं लागणार अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक जण नाराज आहेत.

Tanmay Tillu

मुंबई : विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या 25-30 नेत्यांना शिंदे गट आणि विशेषत: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे उमेदवारीवर पाणी सोडावं लागणार आहे. त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. हे नेते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपला गळती लागण्याची चिन्हं असल्यानं भाजपकडून या नेत्यांना थोपवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे शिवसेनेला मिळालेल्या सर्व जागा शिंदे गटाला हव्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या सर्व जागांसह आणखी काही जागांसाठी अजित पवार गटाचा आग्रह आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्यानं ते नाराज आहेत. हे नेते शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंकडे गेल्यास त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील त्यांचे सहकारी नेतेही जाण्याची शक्यता आहे. कोणकोणते नेते काठावर आहेत त्यावर एक नजर टाकूया.

इंदापूर

विद्यमान आमदार राष्ट्रवादी (AP) दत्तात्रय भरणे

भाजपचे इच्छुक हर्षवर्धन पाटील

वडगाव-शेरी

विद्यमान आमदार राष्ट्रवादी (AP) सुनील टिंगरे

भाजपचे इच्छुक जगदीश मुळीक

अमळनेर

राष्ट्रवादी (AP) अनिल पाटील

भाजपचे इच्छुक शिरीष चौधरी

कोपरगाव

राष्ट्रवादी (AP) आशुतोष काळे

भाजपचे इच्छुक विवेक कोल्हे

कागल

राष्ट्रवादी (AP) हसन मुश्रीफ

भाजपला रामराम

समरजितसिंहांचा भाजपला रामराम

राष्ट्रवादी (SP)

महायुतीत जागावाटपाची चर्चाही सुरु झालेली नाही. मात्र त्याआधीच नाराजांनी वेगळी वाट धरण्याचे मनसूबे आखलेत. त्यामुळे महायुतीतला पेच वाढला असून सर्वाधिक डोकेदुखी भाजपची वाढणार आहे. त्यामुळे भाजपला नाराजांना रोखण्यात यश येणार की मविआला फायदा होणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT