Uddhav Thackeray And Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, संजय राऊतांनी तारीख अन् वेळ सांगितली

Uddhav Thackeray And Raj Thackeray: मनसे-शिवसेना युतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना- मनसे युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत जाहीर केले.

Priya More

Summary:

  • शिवसेना -मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाला

  • शिवसेना-मनसे युतीची घोषणा उद्या होणार

  • उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार

  • खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली माहिती

शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाला. मनसे-शिवसेना युतीची घोषणा उद्या होणार आहे. उद्या दुपारी १२ वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत युतीची घोषणा करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र असलेला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'उद्या १२ वाजता' असे लिहिले. या ३ शब्दात त्यांनी उद्या युतीची घोषणा होणार असल्याचे जाहीर केले.

अखेर शिवसेना-मनसे युतीचे ठरले. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे-शिवसेनेच्या नेत्यांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. मनसे-शिवसेना युतीचा मुहूर्त अखेर ठरला असून युतीबाबत निर्णय झाला आहे. उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू एकत्र येत युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. खरं तर आज युतीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी सुत्रांनी दिली होती. पण याबाबत आज संजय राऊत यांनी अधिकृत माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ठाकरे बंधूंचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. या फोटोत ठाकरे बंधूंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. ठाकरे बंधूंचा हा फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी उद्या १२ वाजता ऐवढेच लिहिले आहे. त्यामुळे उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार हे निश्चित झाले आहे.

संजय राऊत यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवं समिकरण तयार होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधू एकत्रित येत आगामी महापालिका निवडणुका एकत्रित लढणार आहेत. मनसे-शिवसेना युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा देखील सुरू होत्या. तसंच मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत देखील चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यात असलेला जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने इंजिनीअर नवरा भडकला; भिंतीवर डोकं आपटून बायकोला संपवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Digestion Problems: थंडीत जेवण पचायला वेळ लागतोय? 'हे' घरगुती उपाय पोटाच्या सगळ्या समस्या करतील दूर

हिंदूंनी किमान ३-४ मुलं जन्माला घातली पाहिजेत; नवनीत राणा यांचं वक्तव्य

Maharashtra Live News Update: युतीची घोषणा उद्या होणार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू - संजय राऊत

BJP- Shiv Sena Yuti: भाजप- शिवसेनेच्या युतीमध्ये कोण घालतोय खोडा? लवकर निर्णय घ्या नाहीतर...,शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT