Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार?

Mahayuti Formula For Lok sabha: एकीकडे महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी रणनिती आखत असताना दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

Maharashtra Political News

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. एकीकडे महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी रणनिती आखत असताना दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही नेत्यांनी अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आलाय. जवळपास त्यानुसारच महायुतीच्या जागावाटपचं सूत्र असेल. अपेक्षेप्रमाणे भाजप हा महायुतीत मोठा भाऊ राहणार आहे. (Latest Marathi News)

भाजप महाराष्ट्रातील तब्बल ३२ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने (BJP) लोकसभा २०१९ निवडणुकीत लोकसभेच्या २६ जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने २२ जागांवर निवडणूक लढवली होती.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त १२ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. विशेष बाब म्हणजे, सध्या शिवसेनेच्या विद्यमान १८ खासदारांपैकी १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. असं असताना देखील शिंदे गटाला लोकसभेच्या फक्त १२ जागाच मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे विद्यमान खासदारांपैकी कुणाचं तिकीट कापलं जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाला लोकसभेच्या ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडे सध्या ३ खासदार आहेत. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाटेला ४ जागा येणार असल्याने शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये शिवसेना मनसेची युती होणार का?

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT