Bharat Gogawale Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत भरत गोगावले यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Government Cabinet expansion : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण महायुतीमध्ये कुणाला कोणतं खातं जाणार? याबाबत अद्याप पेच आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मलाईदार खाती मिळवण्यासाठी चर्चा सुरू आहेत. खाते वाटप अद्याप झालं नसल्यामुळे उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? याची चर्चा सुरू आहे. भरत गोगावले यांनी याबाबत मोठं विधान केलेय.

Priya More

Maharashtra Government Cabinet expansion : महायुती सरकारचा शपथविधीसोहळा आज पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपाचा तिढा काही सुटला नाही. अजूनही मंत्रिपदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं रंगली आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोण-कोण शपथ घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मोठं विधान केले आहे. 'आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील.', असं गोगावले यांनी सांगितलं.

शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितले की, 'अजून आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. पण आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल. बाकीच्या मंत्र्याचा शपथविधी ११ तारखेला होईल. पंतप्रधानांनी दिलेला वेळ कमी आहे. तेवढ्या वेळेमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी उरकणार नाही त्यामुळे कदाचित फक्त तिघांचा शपथविधी होईल. इतर जणांचा शपथविधी ११ तारखेला होईल.'

मंत्रिपदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याबाबतची चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रीपदं मिळावी. त्यानुसार चर्चा सुरू आहे.' तसंच शिवसेनेच्या वाट्याला किती खाती मिळतील यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'वजनदार खाती सर्वच आहेत. त्यामध्ये सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेंना दिला आहे. ते जे काही करतील ते पक्षाच्या हितासाठी करत आहेत. ते योग्य खाती घेतील असं मला वाटते जणेकरून सर्वकाही व्यवस्थित चालेल.'

एकनाथ शिंदे गृहमंत्रिपदावर अडून बसले असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेला गृहखातं मिळेल का? यावर बोलताना गोगावले यांनी सांगितले की, 'प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने मागण्या करत असतो. चर्चा करून जे काही ते सोडवं जाईल. प्रत्येकाला योग्य खाती दिली जातील. शिंदेंनी जे मागितले आहे त्यावर विचार विनिमय सुरू असून आज दुपारपर्यंत हे सर्व संपेल.' तसंच, 'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील की नाही हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल. काही गोष्टी चांगल्या करायच्या असतील तर थोडा विचार करावा लागतो. आतापर्यंत शिंदेसाहेबांनी योग्य निर्णय घेतला त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत. एकनाथ शिंदे आता एका तासामध्ये निर्णय घेऊन जाहीर करतील.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT