Cabinet expansion : एकनाथ शिंदेंना गृहखाते हवं तर अजित पवार अर्थमंत्रालयावर ठाम, मंत्रिमंडळ विस्तार कधी?

Maharashtra Government Cabinet expansion : आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. खातेवाटपामुळे इतर मंत्र्यांचे शपथविधी हिवाळी अधिवेशनाच्या आधी होण्याची शक्यता आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Ajit PawarSaam Tv
Published On

Maharashtra government Cabinet expansion : मुंबई: मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे जाऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली आणि सत्तावाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीसांनी सत्तावाटपाच्या समानतेची हमी दिल्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार झाले आहेत. मात्र, खातेवाटप सरकार स्थापनेनंतर ठरवले जाईल.

शिवसेना अजूनही गृहखाते मिळवण्याच्या मागणीवर ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांसाठी उपमुख्यमंत्री पद आणि वित्त खाते मिळवाण्यावर ठाम असून, त्यांना सुमारे 8-10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यात सहकार, कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा, बंदरे, मदत आणि पुनर्वसन, सिंचन, सामाजिक न्याय, महिला आणि बालविकास यांसारखी महत्त्वाची खाती समाविष्ट असतील. ही खाती ग्रामीण मतदारांशी संबंधित आहेत, जे राष्ट्रवादीचे मुख्य आधार आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी घेतली शिंदेंची भेट

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. प्रथम त्यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी तयार करण्यासाठी विनंती केली आणि त्यानंतर सत्तावाटपाच्या संभाव्य फॉर्म्युलावर चर्चा केली. ही बैठक 30 मिनिटांहून अधिक काळ चालली. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एवढ्याच पदाधिकाऱ्यांचा शपथविधी होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार सरकार स्थापनेनंतर केला जाईल. यावेळी महायूती सरकारमधील सत्तावाटपाच्या व्यापक फॉर्म्युलावर चर्चा झाली. शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला. शिवसेना उपमुख्यमंत्री पद, गृहखाते, तसेच त्यांची विद्यमान नऊ मंत्रालये कायम ठेवण्याचा आग्रह धरत आहे. यामध्ये महत्त्वाचे उद्योग आणि शहरी विकास विभाग समाविष्ट आहेत.

शिवसेनेला ऊर्जा, महसूल, सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम विभागही हवे आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा भाजपने ही सर्व महत्त्वाची खाती घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जात असल्याने, सेनेने याच प्रमाणात महत्त्वाची खाती मिळवावी. आम्ही काही खाते सोडण्यास तयार आहोत, परंतु गृहखाते आणि इतर महत्त्वाची खाती आमच्याकडे राहावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. लवकर खाते वाटपावर एकमत होऊन सरकार स्थापन होईल अशी आशा आहे. 

नागपूर अधिवेशानआधी मंत्रिमंडळ विस्तार, अनिल पाटील यांची माहिती

आज केवळ तिघांचा शपथविधी होईल. ७ - ८ तारखेला विधानभवनात इतरांचे शपथविधी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती वेळासाठी उपलबद्ध आहेत. त्यानुसार कार्यक्रम घेतला आहे.. बाकी नाराजीचा काही विषय नाही. संध्याकाळी कॅबिनेट होईल, त्यात पुढचे निर्णय होतील. सध्या खातेवाटपाचा विषयच नाही, आधी मंत्रीपदी कोण येणार याचा निर्णय व्हायचाय. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे अनिल पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com