Rahul Narvekar Meet Cm Eknath Shinde:  Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मोठी घडामोड, राहुल नार्वेकर - मुख्यमंत्री शिंदेंची गुप्त भेट; तब्बल ४० मिनिटे चर्चा

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली असून राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षावर भेट घेतली. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. ७ डिसेंबर २०२४

Rahul Narvekar Meet Cm Eknath Shinde:

शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय यायला अवघे तीन दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्याचे या निर्णयाकडे लक्ष लागले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका कोणाला धक्का देणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याआधीच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली असून आज राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षावर भेट घेतली. निकालाआधी ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

१० जानेवारीला शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय (Shivsena Mla Disqualification) लागणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आजारी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आज (७, जानेवारी) राहुल नार्वेकर यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यामधील ही भेट नियोजित नव्हती. ही गुप्त भेट होती. मात्र माध्यमांना याबाबतची कुणकुण लागली. अचानक ही तातडीची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वर्षावरील या बैठकीला फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर होते. दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय राऊतांची टीका..

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला आहे. त्याआधीच राहुल नार्वेकर आजारी पडल्याने संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. राहुल नार्वेकर आजारी आहेत, ही राजकीय भूकंपाची सुरूवात आहे.. असा टोला राऊतांनी लगावला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Naik: मराठमोळ्या अक्षया नाईकचा ओटीटी डेब्यू; या वेब सिरिजमध्ये साकारणार खास भूमिका

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

Stomach cancer: महिलांमध्ये लपलेली असतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

SCROLL FOR NEXT