Parivartan Mahashakti Candidate List Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: परिवर्तन महाशक्तीची पहिली उमेदवार यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवार देणार

Parivartan Mahashakti Candidate List: परिवर्तन महाशक्तीने १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे. महायुतीमधील भाजपने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. आज अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. तर महाविकास आघाडीची देखील उमेदवार यादी आज जाहीर होणार आहे. अशामध्ये राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. राज्यात तिसरी आघाडी तयार झाली असून परिवर्तन महाशक्तीने पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली.

परिवर्तन महाशक्तीने १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्तीने अचलपूर, रावेर, चांदवड, राजुरा, एरोली, देंगलुर, शिरोळ आणि मिरज मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मिरज आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले आहेत पण त्याठिकाणी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नाही.

बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले की, 'आज आम्ही नावं जाहीर करतोय. एकत्रित नावं जाहीर करतोय बाकी पक्षांसारखं करत नाही. वैचारिक परिवर्तन आम्ही करतोय. आघाडीमध्ये बिघडी होण्याची शक्यता आहे. युतीमधून एक पक्ष बाहेर पडणार असे आम्हाला कळलं आहे.'

तसंच, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पण उमेदवार आम्ही देऊ. जिथे चांगले उमेदवार मिळतील तिथे नक्की उमेदवारी देणार आहोत. चांगले उमेदवार मिळाले तर नक्की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात उमेदवारी आम्ही देणार आहोत. २८ तारखेला मी उमेदवारीचा फॉर्म भरणार आहे.', असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.

संभाजी राजे यांनी सांगितले की, ' १५० उमेदवारांच्या बाबत आमचं एकमत झालं होतं. आज सुद्धा परिवर्तन महाशक्तीची बैठक झाली. पुढचे टप्पेसुद्धा ठरवले गेले. महाराष्ट्रात परिवर्तन आम्हाला घडवायचे आहे. आज १० नावं आम्ही जाहीर केली.'

उमेदवारांची यादी -

- अचलपूर - बच्चू कडू - प्रहार जनशक्ती पक्ष

- रावेर यावल - अनिल चौधरी - प्रहार जनशक्ती पक्ष

- गणेश निंबाळकर - चांदवड - प्रहार जनशक्ती पक्ष

- सुभाष साबणे - देगलूर - प्रहार जनशक्ती पक्ष

- अंकुश कदम - एरोली - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

- माधव देवसरकर - हदगाव हिमायतनगर - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

- गोविंदराव भवर - हिंगोली - महाराष्ट्र राज्य समिती

- वामनराव चटप - राजुरा - स्वतंत्र भारत पक्ष

- शिरोळ - स्वाभिमानी शेतकरी संघटना

- मिरज - स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! प्रतितोळा ₹१७१००० वर पोहचले, आठवड्यात कधी स्वस्त, कधी महाग? वाचा सविस्तर

Messy Bun Hairstyle: साडीवर शोभून दिसणारा मेसी बन कसा बांधायचा? स्टेप बाय स्टेप पद्धत

Maharashtra Live News Update : लातूर जिल्हा परिषदेत भौतिक सुविधांचा अभाव

Mumbai Crime: मुंबई हादरली! भांडुपमध्ये शाळकरी मुलाची मित्रांकडून हत्या, आधी संपवलं नंतर तलावात फेकलं

Actress Assault: 'अचानक मला Kiss केलं...'; लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला नको तो प्रकार

SCROLL FOR NEXT