Ajit Pawar Group Meeting Sharad Pawar  SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवार आणि बंडखोर आमदारांमध्ये काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्वाची माहिती

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचा गट युती सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

तर शरद पवार यांच्या गटाला देखील काही आमदारांचा पाठिंबा आहे. दरम्यान, एकीकडे दोन्ही गटांमध्ये टीका टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी सोमवारी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसूटल चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच शरद पवार आणि आमदारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली.

काय म्हणाले जयंत पाटील?

माध्यमांसोबत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांना भेटून काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती, त्याच विनंतीचा पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला.

शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात आहे. आमचे सर्व आमदार अधिवेशनावेळी विरोधी पक्षांबरोबरच बसले होते. तिथेच त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील नऊ सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे. तुम्ही अधिवेशनातली व्यवस्था पाहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विखुरले होते. काही जण विरोधी पक्षांच्या बाजूला बसलो होते, तर काहीजण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले होते. कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही".

"शरद पवार यांनी त्यांची भूमिका याआधी स्पष्ट केली आहे. तसेच येवल्यातल्या सभेतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती. त्यामुळे रोज त्यांना कोणीतरी भेटल्यावर त्यांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही", असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, सर्व आमदार शरद पवार यांना भेटायला आल्यावर शरद पवार यांनी मलाही बोलावले. मी नुकताच राज्यपाल रमेश बैस यांना भेटून घरी गेलो होतो. त्यानंतर मला पवार साहेबांचा फोन आला. त्यांनी मला ताबडतोब या, आमदार भेटीला आले आहेत, असं सांगिलतं.

पण मी साहेबांना सांगितलं की मला पोहचण्यासाठी उशीर होईल, तुम्ही त्यांना भेटून घ्या. पण तुम्ही आल्याशिवाय मी कोणालाही भेटणार नाही असं त्यांनी मला सांगितलं. मी आल्यानंतर त्यांनी भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल शंका घेण्याची गरज नाही, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

SCROLL FOR NEXT