Maharashtra Political Latest News saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन लागलं तर... भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य

Ajit Pawar Going With BJP : पडद्यामागे नक्की काय चाललंय हे नेमकं समोर आलं नसलं तरी शिवसेना आणि भाजपाचे आमदार याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.

Chandrakant Jagtap

>>अभिजीत देशमुख

Maharashtra Political Latest News: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी चांगलाच वेग पकडला आहे. या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पडद्यामागे नक्की काय चाललंय हे नेमकं समोर आलं नसलं तरी शिवसेना आणि भाजपाचे आमदार याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.

आता कल्याण पूर्व येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पक्षामध्ये चर्चा सुरू आहे की एक मोठी घडामोड होणार आहे. खरंतर अजित दादा हे कणखर नेतृत्व आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ते आले तर महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती मिळेल, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे.

तसेच ते म्हणाले की, 'आपण आपण असेल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो काम करण्याचा स्पीड आहे. त्या डबल इंजिनच्या सरकारमध्ये एक तिसरं इंजिन लागलं तर आमच्या गाडीचा स्पीड आणखी वाढेल. दादांचं आम्ही स्वागतच करणार आहोत, आम्हाला आनंद आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.

अजित दादांमुळे युती आणखी भक्कम होईल - विश्वनाथ भोईर

अजित दादांच्या युतीमधील प्रवेशाच्या चर्चेवर भाजप आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की, अजित दादांसोबत अडीच वर्ष सरकारमध्ये काम केले. त्यामुळे असा नेता युतीसोबत येणार असेल तर युती आणखी मजबूत होईल. अजितदादांच्या युतीमधील प्रवेशाचं आम्ही स्वागतच करू अशी प्रतिक्रिया आमदार भोईर यांनी दिलीय. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT