Mla Rohit Pawar Post on BJP Vidhan Sabha Survey Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: "भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत अजितदादांना ७, तर शिंदेंना इतक्याच जागा मिळणार"

Mla Rohit Pawar Post on BJP Vidhan Sabha Survey : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांना किती जागा मिळणार याबाबत रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केली आहे.

Satish Daud

Maharashtra Political Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रात बिहार पॅनर्ट राबवून मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहांकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांच्या या मागणीने शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय. दरम्यान, या मागणीची चर्चा होत असतानाच शरद पवार गटाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांना किती जागा मिळणार याबाबत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, "एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे".

"या सर्व्हेत अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत".

"भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी (Ajit Pawar) पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय", असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय.

"कर्जत_जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असं सांगितल्याने कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे", असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

अजितदादांनी अमित शहांकडे काय मागणी केली?

दुसरीकडे, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी मुंबई एअरपोर्टवर महायुतीमधील महत्वाचे नेते आणि अमित शहांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजितदादांनी ही मागणी केल्याचं समजतंय. त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT