Maharashtra Politics: बिहार पॅटर्न राबवा अन् मला मुख्यमंत्री करा, अजितदादांच्या मागणीने शिंदे गटाची झोप उडाली!

Ajit Pawar Demand To Amit Shah : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली.
बिहार पॅटर्न राबवा अन् मला मुख्यमंत्री करा, अजितदादांच्या मागणीने शिंदे गटाची झोप उडाली!
Ajit Pawar Demand To Amit ShahSaam Tv
Published On

BJP-NCP-Shivsena Alliance Political Update: महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. रविवारी मुंबई एअरपोर्टवर महायुतीमधील महत्वाचे नेते आणि अमित शहांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजितदादांनी ही मागणी केल्याचं समजतंय. त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

बिहार पॅटर्न राबवा अन् मला मुख्यमंत्री करा, अजितदादांच्या मागणीने शिंदे गटाची झोप उडाली!
Maharashtra Politics: भाजपचं 125चं मिशन, शिंदे आणि अजित पवार गटाला टेंशन? 160 जागा लढवण्याचा BJP चा आग्रह?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 8 सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली होती.

एकमेकांचे पाय खेचून महायुतीत वादाचे फटाके फुटू देऊ नका. निवडणुकीपूर्वी तिन्ही पक्षात समन्वय ठेवा तसेच उघडपणे विधाने करू नका, अशा कानपिचक्या अमित शहा (Amit Shah) यांनी तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना दिल्या.

बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली. भाजपने किमान 160 जागांवर आपले उमेदवार उभे करावे. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाला प्रत्येकी 64 जागा द्याव्यात, अशी मागणी पक्षातील नेत्यांनी अमित शहांकडे केली.

मात्र, सध्यातरी जागावाटपाबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. अशातच अमित शहा हे दिल्लीला जाण्याआधी त्यांनी सोमवारी पुन्हा महायुतीतील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

बैठकीत अजित पवार यांनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली. मला मुख्यमंत्री करा, अशी इच्छा अजित पवार यांनी अमित शहांकडे उघडपणे बोलून दाखवली. त्यासाठी अजितदादांनी बिहार पॅटर्नचा दाखलाही दिला.

महायुतीनं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घोषित करावं, असं सांगितल्याची माहिती आहे. त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज झाल्याची माहिती आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या मागणीला अमित शहा नेमका काय प्रतिसाद देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बिहार पॅटर्न राबवा अन् मला मुख्यमंत्री करा, अजितदादांच्या मागणीने शिंदे गटाची झोप उडाली!
Gabbar Letter: 'वहिनींना पाडलं, आता अजितदादांना पाडायचं का?' बारामतीत 'गब्बर'चं पत्र व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com