Gabbar Letter: 'वहिनींना पाडलं, आता अजितदादांना पाडायचं का?' बारामतीत 'गब्बर'चं पत्र व्हायरल

Baramati Gabbar Letter: बारामतीत गब्बरचं पत्र सध्या प्रचंड व्हायरल होतंय...बारामतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील राजकीय धूसफूस उघड झाल्याचं बोललं जातंय. नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यावरही भाष्य केलंय. पाहूया यावरचा एक रिपोर्ट
Gabbar Letter: 'वहिनींना पाडलं, आता अजित  दादांना पाडायचं का?' बारामतीत 'गब्बर'चं पत्र व्हायरल
Ajit PawarSaam TV
Published On

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरली ती बारामतीची. नणंद विरुद्ध भावजय लढतीत पवार बाप-लेकीनं यश खेचून आणलं. शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हा नवीन युवा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार बारामती सोडणार अशी चर्चा आहे. खुद्द दादांनी तसे संकेत दिलेत. अशा स्थितीतच बारामतीत 'गब्बर' नामक एक पत्र व्हायरल होतंय..पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यावर हे पत्र आहे.

नेमकं पत्रात काय म्हटलंय, पाहूयात

नमस्कार बारामतीकर !....

अनेक वर्षे झाली बारामतीकर साहेब, दादा, ताई यांच्यावर प्रेम करतात. मात्र सर्वांना माहितीय सध्याचं राजकीय वातावरण भलतंच गढूळ झालंय. साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचाय की काय? बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं. मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला. मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड (जाती) बघून पैशाचं वाटप केलं. मात्र आतातर मजल एवढी वाढली की चक्क नेत्याचीही फसवणूक केली. हीच तर खरी मलिदा गँग. वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला? की आता दादांच्या मागे लागलात. आपला, गब्बर

Gabbar Letter: 'वहिनींना पाडलं, आता अजित  दादांना पाडायचं का?' बारामतीत 'गब्बर'चं पत्र व्हायरल
Ajit Pawar: विकासकामे करूनही बारामतीत हारलो; अजित पवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली नाराजी

या पत्रावर युगेंद्र पवार यांनी मात्र भाष्य करणं टाळलं. दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी बारामतीचा विकास अजित पवारांमुळे झाल्याचा उल्लेख करत यशाचा विश्वास व्यक्त केलाय. बारामतीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी दोन्ही राष्ट्रवादीत विभागले गेलेत. त्यातही अनेकजण हातावर घड्याळ बांधून मनातून तुतारी फुंकत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत बारामतीकर जनता लोकसभेचाच कौल कायम ठेवणार की निर्णय बदलणार याची उत्सुकता असली तरी सध्या मात्र बारामतीत हे गब्बरचं पत्र चर्चेचा विषय ठरलंय.

Gabbar Letter: 'वहिनींना पाडलं, आता अजित  दादांना पाडायचं का?' बारामतीत 'गब्बर'चं पत्र व्हायरल
Ajit Pawar: लोकसभेचा पराभव जिव्हारी? अजित पवार बारामती सोडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com