Ashish Shelar On Uddhav- Raj Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दुबार मतांमध्ये फक्त मराठी, हिंदू दिसतात का? आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

Ashish Shelar On Uddhav- Raj Thackeray: मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ठाकरे बंधूंना भाजप नेते आशिष शेलार यांनी खडेबोल सुनावले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत दुबार मतांमध्ये फक्त मराठी, हिंदू दिसतात का? असा सवाल केला आहे.

Priya More

Summary -

  • मतदार यादीतील गोंधळावरून ठाकरे बंधू आणि मविआ आक्रमक झालेत

  • राज ठाकरे यांनी मतदार यादी शुद्धीकरणासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली

  • आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांना खडेबोल सुनावले

  • शेलार यांनी ठाकरे बंधूंना हिंदू आणि दलित मतदारांविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप केला

मतदार यादीतील गोंधळावरून ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. ठाकरे बंधू आणि मविआने मुंबईत शनिवारी मोर्चा काढला होता. यावेळी राज ठाकरे यांनी मतदार यादी शुद्ध करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर राजकीय वाद पेटला आहे. या मागणीला उत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी 'तुमच्या हरकती आणि सूचना घेण्यामध्ये अधिकृत निवडणूक आयोगाचा भाग तुम्ही करत नव्हते, झोपले होते,' असा थेट आरोप केला आहे. चर्चेनुसार निवडणूक आयोगाने बूथ लेव्हल एजंट (BLA) आणि पोलिंग एजंट नेमण्याची कायदेशीर पद्धत उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, राज ठाकरेंच्या पक्षाने या प्रचलित पद्धतींचा वापर न करता केवळ मुस्लिम आणि विशिष्ट समाजाला लक्ष्य करून आरोप केल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. त्यामुळे, वर्षभर निवडणुका थांबवण्याऐवजी अस्तित्वात असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून दुबार मतदारांवर आक्षेप घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना अनेक सवाल केले आहेत.

भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दुबार मतदारांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आशिष शेलार यांनी ठाकरे बंधू केवळ हिंदू आणि दलित आडनावाचे दुबार मतदार दाखवून मुस्लिम दुबार मतदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. 'हिंदू आणि दलित मतदार असेल तर त्याला फटका मारा आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा, हीच का तुमची भूमिका?', असा सवाल आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना केला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये कर्जत-जामखेड, साकोली, बीड, धारावी अशा अनेक मतदारसंघांतील मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी सादर केली. हा 'वोट जिहाद' असून, आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणूक यंत्रणेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. भाजपने मतदार यादी शुद्धीकरणासाठी 'Special Intensive Revision' (SIR) कार्यक्रमाला पाठिंबा दिला असून, मविआ आणि मनसेनेही त्याला समर्थन द्यावे, असे आव्हान आशिष शेलार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT