Sanjay Raut being acknowledged during the event marking the political reunion of the Thackeray brothers. saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: ठाकरें बंधूंच्या युतीचा हनुमान; संजय राऊतांचा सन्मान, ठाकरेंसाठी राऊत महत्वाचे का?

Sanjay Raut Crucial Role In Thackeray Brothers Yuti : हिंदीसक्तीच्या विरोधातील विजयी मेळाव्यात चर्चा झाली ती बाळा नांदगावकरांच्या निष्ठेची. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणणारा युतीचा हनुमान ठरलेत ते म्हणजे संजय राऊत. पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरेंनी तसं दाखवून दिलं. ठाकरेंसाठी संजय राऊत महत्वाचे कसे आहेत.पाहूयात.

Suprim Maskar

  • ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीमागे संजय राऊतांचा मोठा वाटा

  • राज ठाकरे यांनी जाहीरपणे राऊतांच्या भूमिकेचं कौतुक केलं

  • बाळासाहेब ठाकरे यांचं ‘राज–उद्धव एकत्र’ स्वप्न पूर्ण

महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस विशेष ठरला. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा युती केली ती ज्यांच्याशी फारकत घेतली होती त्याच शिवसेनेशी. महाविकास आघाडीला सोडून उद्धव ठाकरेंनीही आपल्या दुरावलेल्या भावाला साद घातली आणि बाळासाहेबांचे उद्धव राज एकत्र येण्याचं स्वप्न आज त्यांच्या पश्चात पुर्ण झालं. या दोन भावांना एकत्र आणण्यामागे आहे, बाळासाहेबांचा एक अनन्यभक्त ज्याचं नाव सगळ्यांनाच माहितीये ते आहेत.

याच संजय राऊतांचा युतीच्या सोहळ्यात सन्मान झाला अन ठाकरे कुटुंबियात त्याचं स्थान किती अढळ आहे हे सगळ्यांनाच कळलं. सामनाचे संपादक म्हणून शिवसेनेची जाज्वल्य हिंदुत्वाची भूमिका मांडणारे रोखठोक अग्रलेख म्हणजे ब्रेकिंग न्यूजच. ठाकरे कुटुंबियांसाठी संजय राऊतांचे आणि राऊतांसाठी ठाकरेंचं महत्व किती अमर्यादित आहेत त्यासाठी काही महत्वाच्या घटनांवर नजर टाकावीच लागेल.

राज ठाकरेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर तेव्हा संजय राऊत त्यांची समजूत काढण्यासाठी कृष्णकुंजवर गेले. असता त्याना समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

बाळासाहेबांच्या निधनाची घोषणा करण्यासाठी डॉ. जलील पारकरांसोबत संजय राऊत माध्यमांना सामोरे

बाळासाहेबांच्या पाश्चात सामनाची संपादकीय जबाबदारी आणि ठाकरे शैली जपण्यात संजय राऊत यशस्वी

2014 भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी राऊतांची भाजपसोबत चर्चेत आघाडी

2019 मध्ये मविआच्या प्रयोगाचे शिलेदार

2022 शिवसेनेत बंड झाल्यानंतर पत्रकार परिषदांनी अस्वस्थ शिवसैनिकांना निर्धास्त ठेवण्याचं आणि विरोधकांना टिकेनं नामोहरम कऱण्यात महत्वाची भूमिका

ऑगस्ट 2022 संजय राऊतांना ईडीकडून अटक,जामिनानंतर थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट

2024 इंडिया आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये संजय राऊतांची शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती

गंभीर आजारी असूनही स्मृतीदिनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उपस्थिती

सेना मनसे युतीसाठी प्रयत्न आणि घोषणाही , याच निष्ठेचं फळ आजच्या पत्रकार परिषदेत दिसलं.

पत्रकार परिषदेत व्यासपीठावर 2 खुर्च्या ठाकरे बंधुसाठी राखीव असतांना राज ठाकरेंनी सूचना करताच संजय राऊतांसाठी व्यासपीठावर खुर्ची लागली.आदित्य ठाकरे, अमित ठाकरे समोर उभे असतांनाही राज उद्धव यांच्या बरोबरीनं संजय राऊत व्यासपीठावर बसले होते. तर पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरेंनी संजय राऊतांना मध्ये बोलावून फोटो काढून घेतला. आज बाळासाहेबांचे आणि तमाम मराठी जनांचे स्वप्न पुर्ण झालं आणि त्याच संजय राऊतांचा खारीचा नव्हे तर मोलाचा वाटा असल्याचं सिद्ध झालं.

राऊत गंभीर आजारानं काही महिन्यांच्या विश्रांतीवर असतांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन त्यांची विचारपूस केली.संजय राऊत तुरुंगात असतांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना धीर दिला होता. ते अटकेत असतांना झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या या समर्पित सेनानीसाठी एक खुर्ची रिकामी ठेवून निष्ठेला अनन्यसाधारण स्थान असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळे आज राम लक्ष्मण म्हणून त्यांनी जरी उद्धव राज यांचं नाव घेतलं असेल तरी या युतीसाठी त्यांनी हनुमानाची भूमिका बजावली असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Amla Benefits: वजन कमी होते, केस गळणे कमी होते...; रोज सकाळी एक आवळा खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

Blouse Pattern Design : साडीत बारीक दिसण्यासाठी ब्लाउजची निवड कशी कराल? ५ टिप्स लक्षात घ्या, दिसाल स्लिम-ट्रिम

SCROLL FOR NEXT