Maharashtra Politics EX MP Bhausaheb Vakchore and ex mla haridas bhade join uddhav thackeray Group  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग सुरू, आज बडा नेता शिवबंधन बांधणार; शिंदे गटाचं टेन्शन वाढणार

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून नवीन पक्षउभारणी करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना सोडून परत गेलेले काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.

Satish Daud

Uddhav Thackeray Latest News: अगदी वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. खरी शिवसेना आपलीच असा दावा करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव पक्षचिन्ह आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे ठाकरे गटातून मोठी आऊटगोईग सुरू झाली.

सुरूवातीला आमदार-खासदार, त्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून नवीन पक्षउभारणी करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना सोडून परत गेलेले काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाचं टेन्शन वाढणार आहे.

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेकडो संर्थकांसह शिवबंधन बांधण्यासाठी वाकचौरे शिर्डीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. "सुबह का भुला श्याम को घर लौटे तो उसे भुला नहीं कहते " अशी प्रतिक्रिया त्यांनी शिर्डीतून निघताना दिली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात २००९ साली रामदास रामदास आठवले यांचा पराभव करत शिवसेनेकडून खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा घरवापसी करत आहेत. २०१४ साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली आहे. येत्या २ सप्टेंबरला बैठक होणार असून त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारिप-बहुजन महासंघ म्हणजे सध्याची वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर दोन वेळा निवडून आले होते. सन् २००४ अन् २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. सन २०१४ च्या निवडणुकीत सध्याचे भाजपचे अकोला पूर्वचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर २०१९ मध्येही ते पराभूत झाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT