Maharashtra Politics Eknath Shinde Group MLA MP will return to Uddhav Thackeray group Shiv Sena Vinayak Raut Big claims  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार; शिंदे गटाचे नेते ठाकरेंकडे परत येणार, बड्या नेत्याचा दावा

Maharashtra Politics News: लोकसभेपूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

Satish Daud

Maharashtra Politics Latest News

ठाकरे गटात परतण्यासाठी शिंदेगटातील अनेकांचे मातोश्रीवर फोन आणि निरोप येत आहेत. लोकसभेपूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

विनायक राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) नेते उदय सामंत यांनी मात्र विनायक राऊत यांचे सर्व दावे हाणून पाडले आहेत. कुणी कितीही स्वप्न स्वप्न बघितली, तरी निवडणुकीनंतर सर्व देश मोदीमय होईल, असं विधान देखील उदय सामंत यांनी केलं आहे.

विनायक राऊत काय म्हणाले?

ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतील गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना शहाणपण शिकवू नये, २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

'राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार'

मराठा आणि ओबीसी यांच्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. त्यांना दोन्ही समाज धडा शिकवेल, अशी टीकाही राऊत यांनी केली. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्यांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. लोकसभेपूर्वी शिवसेनेते मोठा भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.

शिंदे गटाच्या १३ खासदारांपैकी केवळ तीन जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आमच्यासमोर आली आहे. त्यामुळे काही जणांचे मातोश्रीवर फोन सुरू झाले असून अजूनही काही जण निरोप पाठवत आहेत. आमचं चुकलं असं सांगून परत येण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गौप्यस्फोट देखील विनायक राऊत यांनी केला आहे.

उदय सामंत यांना फेटाळला दावा

दरम्यान, विनायक राऊत यांचा दावा उदय सामंत यांना हाणून पाडला. कुणी कितीही दिवा स्वप्न बघितली. तरी सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीनंतर पूर्ण देश हा मोदीमय तसेच भाजपमय झालेला असेल. आमचे आमदार-खासदार त्यांच्या (ठाकरे गटाच्या) संपर्कात असण्यापेक्षा जे शिवसेनेचे नेते म्हणून जाहीर झालेले आहेत. त्यातील काहीजण एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, असं उदय सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT