Kalyan Dombivli Eknath Shinde Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : "सोन्याची अंडी देणारी कोंबडी पकडून ठेवली..." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर तिखट टोला

Kalyan Dombivli Eknath Shinde Politics : डोंबिवलीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर शाब्दिक प्रहार केला. तसेच विकास कामे, निवडणुका आणि संघटनात्मक तयारीवर महत्त्वाचे भाष्य केले.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीत शिंदे गटाचा जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा

  • एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर थेट प्रहार

  • विकासकामे व महिला कल्याण यावर दिला विशेष भर

  • आगामी निवडणुकीपूर्वी डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्ला चढवला. विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व उबाठा व कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास कामे, लाडकी बहीण योजना, आगामी निवडणुका, पक्ष संघटनात्मक मजबुती आणि विरोधकांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, आपले खासदार डॉक्टर आहेत पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो,असा स्पष्ट टोला त्यांनी महाविकास आघाडीला मारला.

उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका करत शिंदे म्हणाले, तुम्ही म्हणता उपमुख्यमंत्री पद घटना बाह्य आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही घटना बाह्य काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की, मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री त्यांची पोटदुखी थांबतच नाही. बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखाना काढला तरीही त्यांना आराम मिळत नाही. आता तुम्हीच त्यांना जमालगोटा द्या. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तिला पकडून ठेवली आणि बाकी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे.असे ही ते म्हणाले .

पत्रकारांनी उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडी कुठे आहे? असा प्रश्न विचारल्यावर, घरी बसली आहे, असा तिखट टोला शिंदेंनी लगावला. याशिवाय त्यापुढे ते म्हणाले, डोंबिवली–कल्याण परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार असून, विकास म्हात्रे यांच्या पॅनलमुळे स्थानिक स्तरावर विकासाच्या कामांना नवी गती मिळेल. शिंदे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आगामी निवडणुकांना डोंबिवलीतूनच वातावरण तापवले. त्यांच्या या भाषणाने कार्यक्रमस्थळी उपस्थित शिवसैनिकांत उत्साह निर्माण झाला.

डोंबिवलीतील या कार्यक्रमातून शिंदे यांनी विकास, संघटन, महिला कल्याण आणि विरोधकांवरील प्रहार अशा सर्व आघाड्यांवरून आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय वातावरण तापवले. तसेच याच कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की,महायुतीचा महापौर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर कसा बसेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती एकत्र राहिली पाहिजे आणि निवडणुका महायुतीनेच लढल्या पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Side Effects: चपातीमुळे वाढतं वजन अन् शुगर वाढते का? अमेरिकन ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

मोठी बातमी! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

SCROLL FOR NEXT