Viral Video : दारू पिऊन शिक्षक वर्गात तर्राट! नाचला, उद्धटपणे बोलला; पालकांनीच केला पर्दाफाश, पाहा VIDEO
Nanded Viral VideoSaam Tv

Viral Video : दारू पिऊन शिक्षक वर्गात तर्राट! नाचला, उद्धटपणे बोलला; पालकांनीच केला पर्दाफाश, पाहा VIDEO

Nanded Drunk Teacher Viral Video : नांदेडमध्ये शाळेत शिक्षक दारू पिऊन वर्गात धिंगाणा घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पालकांनी कारवाईची मागणी केली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published on
Summary
  • नांदेडमध्ये शिक्षक दारू पिऊन वर्गात हजर

  • विद्यार्थ्यांसमोर नाचत आणि राडा

  • पालकांनी व्हिडिओ शूट करून संताप व्यक्त

  • शिक्षकावर कारवाईची मागणी, निलंबनाची शक्यता

नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक दारू पिउन शाळेत आला असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनीच शाळेत जाऊन चित्रित केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकाने मध्यधुंद अवस्थेत राडा घातला. अनंत वर्मा असं या शिक्षकाचं नाव असून हा शिक्षक शाळेत दारू पिऊन आला. त्यानंतर दारूच्या नशेत नाचत होता, उद्धटपणे इतरांशी बोलत होता. चालू वर्गात अशाप्रकारे शिक्षकाचा धिंगाणा सुरु असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांना घडलेली घटना सांगितली.

Viral Video : दारू पिऊन शिक्षक वर्गात तर्राट! नाचला, उद्धटपणे बोलला; पालकांनीच केला पर्दाफाश, पाहा VIDEO
Weather Alert : राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला, कसे असेल आजचे हवामान?

घटनेची सत्यता तपासण्यासाठी पालक स्वतः शाळेत गेले असता, अनंत वर्मा हा दारू पिऊन वर्गात फिरत असल्याचे दिसले. शिवाय चालू वर्गात शिक्षकाने नाचत धिंगाणा घातला. स्वतःला सांभाळता येत नाही अश्या अवस्थेत हा शिक्षक व्हिडीओत चित्रित झाला आहे. या घटनेबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मुलं शाळेत सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली नाही. आता या शिक्षकाच निलंबन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com