Devendra Fadnavis to meet MNS Raj Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

चर्चा तर होणारच, देवेंद्र फडणवीस उद्या राज ठाकरेंना 'शिवतीर्थ'वर भेटणार

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर भेटीगाठी, बैठकांचे सत्र सुरूच आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजपने नवं सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे. फडणवीस उद्या सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी 'शीवतीर्थ'वर भेट घेणार आहेत. राज्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये भेट होणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. (Devendra Fadnavis to meet MNS Raj Thackeray Tomorrow)

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आणि भाजपने (BJP) सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी दोघांनाही पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी आपण राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते राज ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, मुंबईसह राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ही भेट पुढे ढकलली होती.

आता देवेंद्र फडणवीस हे उद्या सकाळी ११ वाजता राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान शीवतीर्थवर या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट होईल, असे सांगण्यात आले आहे. आता दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, भाजपच्या कोट्यातून मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना मंत्रिपद दिले जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आमदार राजू पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही आतापर्यंत भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहोत. हा पाठिंबा हिंदुत्वासाठी दिला आहे. यासाठी आम्ही सरकारमध्ये आहोत. पण कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रिपदासाठी आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही, असं राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहि‍णींना KYCसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता;₹४५०० या दिवशी जमा होणार

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा या देशावर हल्ल्याचा आदेश, ISIS वर अमेरिकन सैन्याचा Airstrikes, पाहा व्हिडिओ

Guru-shani Yog: पुढच्या वर्षी शनी-गुरु बनवणार अद्धभुत संयोग; दोन-ग्रह या राशींना पदोपदी देणार यश

Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT