Devendra Fadnavis on Assembly Elections Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra News : तुमचा फुगा फुटलाय, आजची तारीख लिहून ठेवा; पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, देवेंद्र फडणवीस कडाडले

Devendra Fadnavis on Assembly Elections : मी ठामपणे सांगतो, की आजची तारीख लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला. पण विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा फुगा फुटला आहे. मी ठामपणे सांगतो, की आजची तारीख लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुणे येथील भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते तसेच मंत्र्यांची उपस्थिती आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, यांच्यासह भाजपच्या राज्यातील नेत्यांची देखील अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती आहे.

अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार केला. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या खोट्या नॅरेटिव्हचा फुगा फुटला आहे. मी आज कार्यकर्त्यांना सांगतो, की तुम्ही आजची तारीख लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे".

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आता चातुर्मास सुरू होतो आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, चातुर्मास म्हणजे तपश्चर्या मास असतो. संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो. आपल्यालाही संपर्काचा चातुर्मास साजरा करायचा आहे. आपण २०१३ रोजी पुण्यातील याच ठिकाणी घेतलं होतं. त्यानंतर २०१४ रोजी आपलं सरकार आलं होतं".

"आताही आपण याच ठिकाणी अधिवेशन घेत आहोत आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचेच सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवली. पण विरोधकांनी एक खोटा नॅरेटीव्ह तयार केला की, हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार"

"खोटं फार काळ टिकत नाही. खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम केलंय. हे म्हणत होते की, महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे २० कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला".

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT