Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के, त्यांनी हयातभर खोटारडेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Rohini Gudaghe

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वार पलटवार सुरूच असल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थमंत्री व्हायचं होतं, असा गौप्यस्फोट (Maharashtra Politics) केलाय. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही, अशी देवेंद्र फडणवीस यांनी x वर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते (Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray) पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? असा सवालही त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट (Devendra Fadnavis) नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी वडाळा येथे सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा (Uddhav Thackeray) साधला होता. ‘मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीला ‘कुठलीतरी खोली’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हिणवलं होतं. त्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे म्हणजे म्हणजे नालायक माणूस असल्याचं म्हणत कठोर शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती.

ज्या खोलीला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणत आहात, आमच्यासाठी ती बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) खोली मंदिर आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. आता यालाच X वरून पोस्ट करीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना टिकेला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं (Lok Sabha Election) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT