Maharashtra Politics 2024 : सकाळी भाजपची सभा झाली, नंतर अवकाळी पाऊस आला; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर येताना लोक सांगतं होते, दिल्लीत इंडिया आघाडीच सरकार येणार, मात्र सकाळी भाजपाची सभा झाली आणि अवकाळी पाऊस झाला, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला जालन्यातील सभेत लगावला.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital
Published On

छत्रपती संभाजीनगर येताना लोक सांगतं होते, दिल्लीत इंडिया आघाडीच सरकार येणार, मात्र सकाळी भाजपाची सभा झाली आणि अवकाळी पाऊस झाला, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला जालन्यातील सभेत लगावला आहे. 2014 पूर्वी एक चेहरा होता, चांगलं सरकार भाजप आणणार असं वाटत होतं मात्र 2014 नंतर सगळं चित्र बदललं. 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंनी सगळं सोडून यांना पाठिंबा दिला. मात्र त्यांनी विश्वास घात केला, केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

आम्ही राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं, मात्र एकनाथ शिंदे 40 आमदार आणि खासदार सोबत घेऊन गेले. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली त्यावर अमेरिकेत सुद्धा आम्हाला विचारात तेव्हा आम्ही सांगतो, आमच्यासोबत जनता आहे.किती राजकारण, किती हुकूमशाही, जनता आता हे सहन करणार नाही. याचमुळे दक्षिण भारताने भाजपसाठी दरवाजे बंद केले आहेत. म्हणून ते आता उत्तर भारताकडे बघत आहेत. गॅस, पेट्रोल, डिझेल चे दर वाढत होते तेव्हा आम्ही लठ्या खात असताना हे फोटो काढत होते 10 वर्षात जी आश्वासन यांनी दिली ती पूर्ण केली का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

Maharashtra Politics 2024
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक? ठाकरेंसाठी राऊतांचा पंतप्रधानपदावर दावा

भाजपने सर्व राज्याती पक्ष फोडले आहेत. त्यामुळे आता ४०० जागा निवडून येणार नाहीत, तर यांना घरी बसवणार आहेत. यांना संविधानाला हात लावाचा आहे, त्यांना बाबासाहेब यांचं संविधान नको आहे, म्हणून त्यांना अब कि बार 400 पार जागा हव्या आहेत. आम्ही सत्याने लढत आहोत, आमच्यावर वार केले जात आहेत. मात्र आम्ही न घाबरता छातीवर झेलणार आहोत. खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: 'बहिणीचे जे हाल झाले, तेच भावाचे होणार', अंबादास दानवे यांचा महादेव जानकर यांना खोचक टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com