Devendra Fadnavis On Gopal Shetty Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: गोपाळ शेट्टी पक्ष हिताचे निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis On Gopal Shetty: बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गोपाळ शेट्टी हे देखील इच्छुक होते. पण उमेदवारी अर्ज न दिल्यामुळे गोपाळ शेट्टी हे नाराज झाले.

Priya More

बोरीवली विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गोपाळ शेट्टी हे देखील इच्छुक होते. पण उमेदवारी अर्ज न दिल्यामुळे गोपाळ शेट्टी हे नाराज झाले. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नेहमीप्रमाणे गोपाळ शेट्टी हे पक्ष हिताचा निर्णय घेतील.', असा विश्वास व्यक्त केला.

'भाजपाचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी हे नेहमी पक्षासाठी हिताचे निर्णय घेतात आणि ते सदैव पक्षासोबत असतात. आता ह्या विधानसभा निवडणुकीत देखील ते पक्ष हिताचे निर्णय घेतील.' हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे आज गोपाळ शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज माघारी घेतील अशी चर्चा सुरू आहे.

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे मुंबईत भाजपला धक्का बसला होता. ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी हे पक्ष हितासाठी निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT