maharashtra politics cm eknath shinde devendra fadnavis meet amit shah in delhi ajit pawar news Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार, दिल्लीतून आली गुड न्यूज; अमित शहांसोबत काय चर्चा झाली?

Maharashtra Politics News: बैठकीत अजित पवार यांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा तिढा या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Maharashtra Political Latest News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा तिढा या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. (Latest Marathi News)

पालकमंत्रीपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुती सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. मंगळवारी या चर्चांनी अधिकच जोर धरला. कारण, राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) माध्यमांसोबत चर्चा केली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने ते आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण त्यानंतरही काही घडामोडी घडल्या. येत्या ७ दिवसांत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा, असा अल्टिमेटम अजित पवार गटाने महायुतीला दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, अजित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

त्याचबरोबर रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्रीपदाचा तिढा तसेच राज्यातील अनेक विषयांवर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवला जाईल, असं आश्वासन देखील अमित शहा यांनी शिंदे-फडणवीसांना दिलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT