CM And Deputy CM Criticized Rahul Gandhi  Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi Statement: राहुल गांधी परकीय मानसिकतेलाच धार्जिणे, शिंदे-फडणवीसांचा खोचक टोला

CM Eknath Shinde And Deputy CM Devendra Fadanvis Criticized Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधी खरा चेहरा दाखवला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Priya More

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या टीकानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर खरपूस टीका केली आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची आणि भारतीयांची बदनामी करण्याचा उद्योग करतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच, राहुल गांधी यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधी खरा चेहरा दाखवला असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, 'विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.'

मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, 'आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना आणि महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू.', अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं.

तसंच, 'आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.' असे त्यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींवर एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत टीका केली आहे. त्यांनी असे लिहिले की, 'राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत. जी कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत. आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.', अशा शब्दात फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT