Chandrakant Patil On Manoj Jarange Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: सामान्य मुंबईकरांचा काय दोष? चंद्रकांत पाटील यांची मनोज जरांगेंना हात जोडून विनंती

Chandrakant Patil On Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. सामान्य मुंबईकरांचा काय दोष? असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेकडे हात जोडून विनंती केली.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले.

  • आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली.

  • चंद्रकांत पाटील यांनी मुंबई विस्कळीत करू नका, अशी विनंती केली.

  • मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे.

आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला असून मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. राज्यभरातून मराठा बांधव वाहनं घेऊन मोठ्यासंख्येने मुंबईत आले आहेत. त्यामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचसोबत सीएसएमटी स्थानकावर मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. या आंदोलनामुळे रेल्वेसेवा देखील विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. यासंदर्भात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी 'मुंबई विस्कळीत करू नका, सामान्य मुंबईकरांचा काय दोष आहे.' , असे म्हणत मनोज जरांगेंकडे हात जोडून विनंती केली.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मुंबईत येऊन प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न चर्चेतून सुटेल असं आम्ही वारंवार त्यांना सांगत आहोत. कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती आपण किती ही ठरवलं तरी मान्य होणार नाही. नाईलाजाला काही इलाज नाही. दाखला हवा एवढेच समाधान हवं आहे का? अनेकांना याआधी सर्टिफिकेट दिले आहेतच. या संपूर्ण विषयावर शिंदे समिती अजूनही काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांना हाथ जोडून विनंती आहे की मुंबई विस्कळीत करू नका, सामान्य मुंबईकर यांचा काय दोष आहे.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'महायुतीच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. इतर काळात त्यांना न्याय मिळाला नाही. आरक्षणाचे, सारथीचे कामही आम्हीच करून दिले आहे. विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचे कामही आम्हीच केले आहेत. शिक्षणाच्या, रोजगाराच्या गोष्टी आमच्या सरकारच्या काळात केल्या आहेत.' तसंच, 'मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समजाजबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. आम्ही समाजाच्या पाठिशी आहोत. पण काही लोकं जाणिवपूर्वक २ समाजात वाद पेटवण्याचे काम करत आहेत. पण आम्ही तसे नाही आहोत. आम्ही योग्य मार्ग काढू.', असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

Condom: 'या' देशात आहे कंडोम विक्रीवर बंदी

Saturday Horoscope : ६ राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; शनिवारचा संपूर्ण दिवस जाणार कसा?

Cricketer Became Robber : दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू बनला दरोडेखोर, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

SCROLL FOR NEXT