Thane News
Thane News saam tv
मुंबई/पुणे

Thane News : ठाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, शाखा ताब्यात घेण्यावरुन झाला राडा

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

>>विकास काटे

Maharashtra Politics : ठाण्यात पुन्हा एकदा शाखेचा वाद ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील शिवाई नगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. यावेळी शिवसेनेने जबरदस्ती ही शाखा बळकवल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून करण्यात आला. तसेच शाखेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. हा वाद चिघळू नये यासाठी ठाणे पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू करून गर्दी पांगवण्यासाठी सुरुवात केली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा शाखेबाहेर तैनात करण्यात आला होता.

शिवाई नगर येथील शाखा बंद असताना त्याला टाळे लावलेले असताना त्या शाखेचे टाळे तोडून शिवसेनेकडून शाखेत प्रवेश करत शाखा बलकावल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. शिवाई नगरची शाखा ही गेल्या 35 वर्षांपासून कार्यरत आहे. या शाखेला टाळे लावलेले असताना काही लोकांनी या शाखेचे टाळे तोडून ही शाखा बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाकरे गटाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.

कोर्टाचे कुठलेही आदेश नसताना यांना टाळे तोडण्याचा हक्क कोणी दिला. जर यांना तो हक्क दिला असेल तर तो हक्क पोलिसांनी समजावून द्यावा. हे अनधिकृत कृत्य आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.

यामुळे महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात येईल? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. तसेच जर शिवाई नगर येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघावयची नसेल तर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या शाखेचा निर्णय घेणार नाही तो पर्यंत शाखेचा ताबा पोलिसांनी आपल्याकडे ठेवावा अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

दुसरीकडे शिवसेना प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले की, शिवाई नगर हा मतदार संघ आमदार प्रताप सरनाईक यांच्या अधिपत्याखाली येत असून या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक हे सांभाळतात. या ठिकाणचे तीनही नगरसेवक आणि संपूर्ण पदाधिकारी आमच्या समवेत आहेत. परंतु काही लोक याठिकाणी आपला ताबा आणि मालकी हक्क दाखवण्याचं प्रयत्न करत होते, असे ते म्हणाले.

तसेच 'ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधलेली असून येथील स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी या शाखेत बसायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये विरोध असण्यासारखे काहीच नसल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ही शाखा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ही मान्यता आम्हाला मिळाली आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव लावण्यास सुप्रीम कोर्टाच्या तारखेपर्यंत परवानगी आहे. त्यामुळे सणासुधीच्या दिवशी ठाकरे गटाने अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करू नये असे देखील म्हस्के म्हणाले.

मात्र या शिवसेनेच्या शाखेच्या वादामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. कायदा आणि सुव्यस्थेचा कुठलाही प्रश्न उभा राहू नये यासाठी ठाणे पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू करून गर्दी पंगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्ती करत वाद निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटाकडून यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान भविष्यात पुन्हा या शाखेच्या ताब्यावरून वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT