Devendra Fadnavis | Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभेत 'मविआ'ला शह देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लान; १९ नेते महाराष्ट्र पिंजून काढणार

BJP Leader Chandrashekhar Bawankule Criticized MVA: आरक्षण विषयासंदर्भातील बैठकीमध्ये विरोधक उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय.

Rohini Gudaghe

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीला आता केवळ ३ महिन्यांचाच कालावधी शिल्लक उरला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते वेगवेगळ्या रणनिती आखत आहेत. अशातच 'मविआ' शह देण्यासाठी भाजपने मास्टर प्लान आखलाय. महाराष्ट्रात लवकरच भाजपची जनसंवाद यात्रा सुरू होणार आहे.

यात्रेत भाजपचे केंद्र आणि राज्यातील तब्बल १९ नेते सहभागी होणार आहे. यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याचा महायुतीचा मानस आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (BJP Leader Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

येत्या २१ जुलै रोजी पुण्यामध्ये राज्यातील ५ हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार आहे. त्यात भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख ठरणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा मु्द्दा पेटलेला आहे. त्यामुळे सरकारने आरक्षण विषयासंदर्भात महत्वाची सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं दिसलं. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विरोधकांची भूमिका निंदनीय

आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केलं नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक (Maharashtra Politics) होती. विरोधकांची भूमिका निंदनीय असल्याची टीका बावनकुळेंनी केलीय.

अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचं राजकारण करताना जनतेला दिसलेत. चुकून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर लोकांच्या हिताच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवं असल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. भाजपाचे केंद्र आणि राज्यातील १९ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे आणि महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार (Vidhan Sabha Election) आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.

संघटनात्मक बैठक

राज्यात २१ जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी १९ तारखेला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव ही बैठक घेणार असल्याचंही बावनकुळे (BJP Jan Sanvad Yatra) म्हणालेत. पुण्यात होणाऱ्या अधिवेशनात अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Virat Kohli Birthday Special: किंग कोहलीचा 36 वा वाढदिवस! पाहा त्याचे 10 'विराट' रेकॉर्ड्स

Sunny Leone: सनी लिओनी दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो तुफान व्हायरल

Rahu Gochar 2025: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा!

Viral Video: आकाशात गिरक्या घेत जमिनीवर कोसळले विमान, नागरिकांची घटनास्थळी धावाधाव; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT