Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशाच; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळेंनी मुलाखतीसाठी उद्धव ठाकरेंना थेट पाच सवाल देखील विचारले.

Satish Daud

सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीतून त्यांनी ठाकरेंना अनेक सवाल विचारले. राऊतांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनीही सडेतोड उत्तर दिलं.

देशाच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना केवळ मीच दिसतोय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळेंनी मुलाखतीसाठी उद्धव ठाकरेंना थेट पाच सवाल देखील विचारले. मी विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना ५ मोठे सवाल

  • दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?

  • २. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?

  • ३. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

  • ४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?

  • ५. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

SCROLL FOR NEXT