Mla Bacchu Kadu Meet Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : बच्चू कडू गेम फिरवणार, विधानसभेआधी महायुतीला खिंडार पडणार? पडद्यामागे काय घडतंय?

Mla Bacchu Kadu Meet Sharad Pawar : बच्चू कडू यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने ते महाविकास आघाडीत सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीआधी महायुतीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्य़ातील मोदी बागेत दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने ते महाविकास आघाडीत सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

बच्चू कडू आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात नेमकी काय चर्चा होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. आमदार बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आहेत. ते अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना बच्चू राज्यमंत्री होते.

त्यानंतर शिवसेनेतील अभुतपूर्व फुटीनंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांमध्ये बच्चू कडू देखील होते. दरम्यान, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रि‍पदाची आशा होती. मात्र, त्यांची मंत्रि‍पदी वर्णी लागली नाही.

त्यामुळे बच्चू कडू (Bacchu Kadu) हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय देऊन बच्चू कडू यांची मनधरणी करण्याचा केला. तरी देखील बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरोधात अमरावतीतून आपला उमेदवार उभा केला. नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली.

दिनेश बुब यांच्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू पुन्हा एकदा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे. याबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते पुण्यातील मोदी बागेत दाखल झाले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहेत.

शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेण्यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना कडू म्हणाले, "शरद पवार यांच्यासोबत माझी भेट आधीच ठरली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची आहे. शेतकरी, मजुरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. अपंगांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला एक सप्टेंबरपर्यत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल"

पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले, "⁠याच मुद्द्यांवरून मी आज शरद पवार यांची भेट घेत आहे. मला अंपग, शेतकरी, मजुर यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. त्यासाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो. या मुद्यावरच कोणाबरेबर जायचे याचा निर्णय होईल. ⁠मी कोणावर ही नाराज नाही", असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT