Sandeep Deshpande News Saam TV
मुंबई/पुणे

मनसेचा आणखी एक 'क्रॅश बॉम्ब', राज ठाकरेंच्या शिलेदाराकडून PWD अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO पोस्ट

PWD Bribe Video: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आणखी एक कॅश बॉम्ब टाकला आहे. त्यांनी पीडब्लुडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Priya More

Summary -

  • मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आणखी एक कॅश बॉम्ब टाकला

  • संदीप देशपांडे यांनी पीडब्लुडी अधिकाऱ्याचा लाचखोरीचा दुसरा व्हिडीओ पोस्ट केला

  • व्हिडीओमध्ये अधिकारी कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसतो

  • हिवाळी अधिवेशनात शिवसेना आणि मनसेकडून कॅश बॉम्बचा धडका सुरू

  • मंगळवारीच संदीप देशपांडे यांनी कॅश बॉम्बचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेगटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांसोबतचा व्हिडीओ शेअर करत राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. अंबादास दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्बमुळे राजकारण तापले आहे. अशातच अंबादास दानवे यांच्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील कॅश बॉम्ब टाकत पीडब्लुडीच्या अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी आज सकाळी आणखी एक कॅश बॉम्ब टाकला. त्यांनी नवा व्हिडीओ पोस्ट केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीबाबतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये पीडब्लुडी विभागाचा अधिकारी लाच घेताना दिसत आहे. पीडब्लुडी विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचार संदीप देशपांडे यांनी दुसरा व्हिडीओ पोस्ट करून समोर आणला आहे.

संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत 'सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त "खाते " भाग दुसरा...' असे कॅप्शन दिले आहे. महत्वाचे म्हणजे संदीप देशपांडे ९ वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमका काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना आणि मनसेकडून कॅश बॉम्बचा धमाका सुरू आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पीडब्लुडीच्या हाफकीन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडीओ सर्वांसमोर आणला होता. यावेळी त्यांनी आरोप केला होता की, '२ लाख ८० हजार रुपये फक्त शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात. आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची. पण आता निधी आणण्याचे, वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते. यासोबत भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोली देखील लागते.'s संदीप देशपांडे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकारणात खळबळ उडाली होती. आज पुन्हा त्यांनी दुसरा व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ६ दिवसांत सारंखेडाच्या घोडेबाजारात ३१५ घोड्यांची विक्री

Leoprad : नागपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, अनेकांवर केला हल्ला, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु | VIDEO

Shiv Sena Mla: शिंदे सेनेच्या आमदाराच्या घरात कोट्यवधींच्या नोटा? नेमका आमदार कोणता?

CIDCO Home : सिडको घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता, एकनाथ शिंदे महत्त्वाचे निर्णय घेणार?

Instagram युजर्ससाठी खूशखबर! आवडलेल्या अन् टॅग नसलेल्या स्टोरीज होतील पुन्हा शेअर, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT