Maharashtra Politics Ajit Pawar will soon become Chief Minister of Maharashtra NCP Mla Dharmarao Baba Atram Big claim ssd92 saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार, आम्ही कामाला लागलोय; बड्या नेत्याचं विधान

Maharashtra Political News: लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. असं विधान राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे.

Satish Daud

Maharashtra Political News

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. एकीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्याने सूचक विधान केलं आहे. लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. असं विधान राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्राम यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावर वारंवार भाष्य केलं जात असल्याने शिंदे गटात (Eknath Shinde) नाराजी पसरल्याची चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे भाजपने सुद्धा शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' असा व्हिडीओ ट्वीट केलं होतं. आता धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केल्याने या चर्चांनी जोर धरला आहे.

काय म्हणाले धर्मराव बाबा आत्राम?

अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्यासाठी देखील कामाला लागलो आहेत. असं सूचक विधान धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं. त्याचबरोबर राज्यात अजित पवार गटाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

महायुतीमध्ये ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला ठरला आहे, असा दावाही धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. दरम्यान, धर्मराव बाबा आत्राम यांच्या सूचक विधानामुळे अजित पवार यांना समर्थन दिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लवकरच दादा मुख्यमंत्री होतील, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत.

दुसरीकडे भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ट्वीट केलेला व्हिडीओ तासाभरातच डिलीट केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ पाहिला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेतली आहे.. दुसरीकडे उदय सामंत वगळता शिंदे गटाच्या कुठल्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT