Maharashtra Politics Ajit Pawar Upcoming CM in Maharashtra NCP Mla Amol Mitkari Tweet Viral Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... बड्या नेत्याचं ट्वीट व्हायरल

Ajit Pawar Birthday: 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व'. अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Upcoming CM Amol Mitkari Tweet: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा नेम राहिला नाही. अगदी वर्षभरापूर्वी महाविकासआघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत थेट गुवाहाटी गाठली. परिणामी सरकारचं बहुमत कमी झालं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसह हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांना घेऊ अजितदादा शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले.

त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतली. मात्र, तेव्हापासून अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे अंदाज वर्तवले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांचा आज म्हणजेच शनिवारी २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

अमोल मिटकरी यांचं ट्वीट व्हायरल

अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असे कॅप्शन दिले. अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.

त्यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता बळावत आहे.अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच महाराष्ट्राचे राजकारण तापवणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. आता या ट्विटवर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर अजित पवारांचे बॅनर्स

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. “जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार”, असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. सलीम सारंग यांनी हे बॅनर लावलं आहे. या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT