A senior BJP leader Sandeep Waghore publicly joined the Nationalist Congress Party in the presence of Ajit Pawar in Pimpri. saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दे धक्का! अजितदादांचं भाजपला जशास तसे उत्तर; 'किंगमेकर' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pimpri-Chinchwad Politics: पिंपरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला चोख प्रत्युत्तर दिलंय. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते भाजपनं फोडली होती. त्याचा बदला राष्ट्रवादीनं घेतलाय, एका प्रभावशाली भाजप नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

  • भाजपच्या फोडाफोडीला अजित पवारांनी जशास तसं उत्तर दिलं

  • पिंपरीतील प्रभावी भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • आगामी महापालिका निवडणुकांआधी राजकीय समीकरणं बदलली

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

नेत्याची फोडाफाडी करणाऱ्या भाजपला पिंपरीत राष्ट्रवादीनं जशास तसे उत्तर दिलंय. दोन दिवसापूर्वी १५ माजी नगरसेवकांना भाजपमधून पळवून देणाऱ्या भाजपचा बदला राष्ट्रवादीनं घेतलाय. निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूनं फिरवणाऱ्या नेत्याला भाजपमधून फोडत राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणलाय. संपूर्ण पॅनल विजयी करण्याची ताकद असलेले भाजपचे पिंपरी गावातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हाती घड्याळ बांधलंय.

पुणे शहरातील बारामती होस्टेल येथे स्वतः अजित पवार यांनी वाघेरे यांचे स्वागत केलं. वाघेरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे मिळून संपूर्ण पॅनल जिंकण्याची शक्यता वाढलीय. दरम्यान माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे आणि ११ माजी नगरसेवकांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

इतक्या नेत्यांचे भाजप प्रवेश होणं हे राष्ट्रवादीसाठी धक्का मानलं जात होतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं या धक्क्याचा बदला आज घेतलाय. आज संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं भाजपमधील अनेक ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आलेत. दरम्यान मावळ लोकसभा निवडणुकीत संदीप वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी देऊ केली होती. संजोग वाघेरेयांच्या ऐवजी संदीप वाघेरे लोकसभा उमेदवार असते, विजय मिळाला असता.

कारण पिंपरीगाव परिसरात संदीप वाघेरे यांनी महापालिकेशिवाय स्वखर्चाने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत, त्यामुळे त्यांच्यापाठी मोठा जनाधार आहे. वाघेरे यांच्या राष्ट्रवादीती प्रवेशाचा परिणाम परिसरातील दोन-तीन प्रभागांवर होण्याची शक्यता आहे. आज मनसेचे कैलास दांगट आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका अजित पवार यांच्या भेटीला आलेत. वारजे भागात अजित पवारांच्या सायली वांजळे यांनी भाजपात प्रवेश केल्यांनंतर अजित पवार यांच्याकडून दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी घेण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT