Ajit Pawar And Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का, OBC चा बडा नेता शरद पवार गटाच्या वाटेवर

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ओबीसीचा बडा नेता अजित पवार गटाची साथ सोडणार असून लवकरच ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाला शरद पवार गटाचा मोठा धक्का बसणार आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भावना घेऊन ओबीसी पदाधिकारी पवारांच्या गटात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT