Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: अजित पवार गटाचे उमेदवार एबी फॉर्म मागे घेतील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आशा

Devendra Fadnavis On Ajit Pawar Group Candidate: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये आले आहेत. सध्या ते नेते मंडळींची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी- चिंचवड

'ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्या ठिकाणी ते उमेदवार मागे घेणार. अशी मला अपेक्षा आहे.', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे शहरात दाखल झाले. आपल्या पुणे शहर दौऱ्यातून दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरातील वेगवेगळ्या नेते मंडळींची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी महायुतीमधील बंडखोरीबाबत मोठं विधान केले.

'महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणुकीसाठी पोलिस सुरक्षित पैशाची वाहतूक होत असे, असं एकूण तुम्ही ऐकून आहे. मात्र त्यांनाच आता असे भास होत असल्याने ते असे आरोप करत आहेत.' असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे. तसंच, 'जयंत पाटील यांना तुम्ही कधीच सिरीयसली घेऊ नका, ते नेहमी मस्करीच्या भूमिकेमध्ये असतात.', असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा फाईल वरून माध्यमांना दिला आहे.

'भाजपाचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी हे नेहमी पक्षासाठी हिताचे निर्णय घेतात आणि ते सदैव पक्षासोबत असतात. आता ह्या विधानसभा निवडणुकीत देखील ते पक्ष हिताचे निर्णय घेतील.' हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे गोपाळ शेट्टी हे नाराज झाले होते. त्यांनी बंडखोरी करत बोरिवलीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी हे पक्ष हितासाठी निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT