maharashtra politics Ajit Pawar and Eknath Shinde will contest elections on BJP ticket MLA Rohit Pawar big prediction  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि अजितदादा भाजपच्याच तिकिटावर लढतील; बड्या नेत्याच्या भाकिताने खळबळ

Maharashtra Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही भाजपच्याच तिकिटावर लढतील, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

Satish Daud

Maharashtra Political Latest News

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्ण कलाटणी मिळाली. दोन्ही पक्षांमधील एक-एक गट सत्तेत सहभागी असून दुसरा गट विरोधी पक्षात आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने एक मोठं भाकित केलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही भाजपच्याच तिकिटावर लढतील, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे शुक्रवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही, तर एक राजकीय भाकित देखील केलं. एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला जात असून दुसरीकडे मावळबद्दल बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अडचणीत आणलं जात आहे. दोन्ही लोकनेत्यांचे अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवले जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवले जाणार आहे, असं मोठं भाकित देखील रोहित पवार यांनी केलं.

दरम्यान, आमदार अपात्रतेसंदर्भात देखील रोहित पवार यांनी मोठं विधान केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे गटाला अपात्र ठरवणार नाही, पण सुप्रीम कोर्टात ते अपात्र ठरतील, असंही रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवार गटाकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT