Ajit Pawar Oath ceremony  Saam tV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : खातेवाटपाची अंतिम यादी समोर? भाजपकडील ६, शिवसेनेच्या वाट्याची ३ खाती राष्ट्रवादीला मिळणार

Rashmi Puranik

Mumbai News : अजित पवारांच्या नेतृ्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र १२ दिवस उलटूनही मंत्र्यांचं खातेवाटप रखडलं आहे. आता हे खातेवाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांना अर्थमंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून राष्ट्रवातील ३ खाती दिली जाऊ शकतात. तर भाजपकडून ६ खाती दिली जाण्याची शक्यता आहे. (Political NEws)

अजित पवार गटाचे अंतिम खातेवाटप

अर्थ - अजित पवार

कृषी - धनंजय मुंडे

सहकार- दिलीप वळसे पाटील

वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ

अन्न नागरी पुरवठा - छगन भुजबळ

अन्न आणि औषध प्रशासन - धर्मराव अत्राम

मदत आणि पुनर्वसन - अनिल भाईदास पाटील

क्रीडा- संजय बनसोडे

महिला आणि बालकल्याण - अदिती तटकरे (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला ३ खाती

कृषी, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन

भाजपकडून ६ खाती

अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा. महिला आणि बालकल्याण ही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिली जाऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT