Sanjay Raut Criticized: तुम्ही चाणक्याच्या पोटातून जन्म घेतला आहे का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

Sanjay Raut On Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Devendra Fadnavis Vs Sanjay RautSaam TV

Sanjay Raut News: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय उलथापलथीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरोपाच्या फेरी झडत आहे. 'तुम्ही वापरलेली कुटनीती आम्हाला जमत नाही का, तुम्ही चाणक्याच्या पोटातून जन्म घेतला आहे का? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'उद्धवजी खोटे बोलले असा आरोप करणे हा पोहरादेवीचा अपमान आहे. मला सकाळपासून त्या समाजाच्या लोकांनी फोन केला की, देवेंद्र फडणवीस वारंवार आमच्या पोहरादेवीचा अपमान करत आहेत. पोहरादेवीची कोणी खोटी शपथ घेत नाही. ते जागृत देवस्थान आहे. पण हे सगळेजण पोहरादेवीला खोटे पाडत असून हा अपमान आहे'.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
PM Narendra Modi Get Award From France : PM मोदींना फ्रान्सकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'लिजन ऑफ ऑनर' मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान

'देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे की, आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो हा अधर्म आहे. मग आता शिंदे गट- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली हे काय होतं, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. वैफल्यग्रस्त अवस्थांमध्ये चुकीचं विधान करू नका, असेही राऊत म्हणाले.

'महाराष्ट्रामध्ये 2019 साली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली, ती सुद्धा या राज्याची गरज आणि कुटनीतीच होती. तुमच्यासारख्या लोकांना दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असे राऊत म्हणाले.

'देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, मुंख्यमंत्री शिंदे खोटे बोलत आहेत. अजित पवारांना कंठ फुटायचा आहे. तेव्हा आम्ही बोलूच, पण मला त्यात पडायचं नाही. फडणवीस आणि शिंदे यांनी केलेला विश्वासघात महाराष्ट्राच्या काळजात आरपार घुसलेला आहे. तुम्ही वापरलेली कुटनीती जमत नाही का? तुम्ही काय चाणक्याच्या पोटातून जन्म घेतला आहे का? चाणक्य आणि विदुर तुमचा बाप आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Maharashtra Politics: राज्यातील राजकीय उलथापालथ परळीला विचारल्याशिवाय होणार नाही, हे सिद्ध करुन दाखवलं - धनंजय मुंडे

'महाविकास आघाडी स्थापन केली ही सुद्धा कुटनीतीच होती. कालपर्यंत नाही नाही नाही कोणती ही राष्ट्रवादीसोबत युती नाही, आपत धर्म अमुक धर्म नाही, तमुक कर्म नाही आणि आता म्हणे भावनिक युती होणार, अशी टीका राऊतांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com