Maharashtra Politics Ajit Pawar News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...' अखेर तो क्षण आलाच!

Maharashtra Politics Ajit Pawar News : प्रशासकीय यंत्रणेवर पकड असलेले अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर्स देखील झळकले आहेत.

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेकदा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. मात्र, उपमुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक वेळा विराजमान होण्याच रेकॉर्ड अजित पवार यांच्याच नावावर आहे. प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड असलेले अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर्स देखील झळकले आहेत. याचीच पुनरावृत्ती पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली.

अजित पवार (NCP Ajit Pawar) यांचा उद्या म्हणजेच २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. तत्पुर्वी आज पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही, तर कार्यकर्त्यांनी यावेळी अनोखा केक देखील आणला.

या केकवर 'मी अजित आशा - अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) म्हणून शपथ घेतो की ...' अशा आशयाचा मजकूर देखील छापण्यात आला होता. हा केक आपल्या लाडक्या नेत्याने कापावा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच त्यांनी केकचा तुकडा देखील खाल्ला. केकवरील मजकूर वाचून अजित दादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा घोषणा देखील दिल्या. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात शुभेच्छांचे बॅनर्स लागले आहेत. तरुण कार्यकर्त्यांसह पदाधिकारी तसेच नेत्यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, उद्या अजित पवार यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मंत्रालय आणि विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे बॅनर्स लागले आहेत. अजित पवार यांना वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर हे मंत्रालय परिसरात लावण्यात आले आहेत.

परंतु सलीम सारंग जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत, त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जो बॅनर लावलाय त्यातील मजकूर महत्वाचा आहे. तुम्ही मत कोणाला दिलं हे बघणार नाही. पण आपले काम आणि आपलं संरक्षण हे दादाच करणार, अशा आशयाचा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT