Maharashtra Political Crisis Eknath Shinde
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अधिकृत व्हीप कुणाचा? शिंदे गटाविरोधात शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात सत्तांतर झालं असलं तरी, अधिकृत शिवसेना नेमकी कोणती यावरून सध्या वाद सुरू आहे. शिवसेनेनं (Shivsena) व्हीप बजावला असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटानेही व्हीप काढल्याने आता हा वाद कोर्टात पोहचला आहे. शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार नाही असा दावा शिवसेनेने (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात केला आहे. (Eknath Shinde Latest news)

या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ११ जुलै आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात होणाऱ्या सुनावणीसोबत ही सुनावणी घेतली जाईल असं सांगितलं आहे.

रविवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशन सत्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेने व्हीप विरोधात ३९ आमदारांनी मतदान केले असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर आधीच्या पिठासीन अधिकाऱ्यांनी व्हीपच्या विरोधात ३९ मतदारांनी मतदान केल्याचं सभागृहात रेकॉर्डवर आणलं होते. (shivsena Latest news)

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आसनावर आले. त्यावेळी त्यांच्यासमोर कुठलाही नवीन व्हीप नव्हता. मात्र, तरीही त्यांनी पुन्हा त्याच व्हीपच्या आधारे कारवाई करणे हे असंवैधानिक असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. या मुद्याच्या आधारे शिवसेना सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मात्र सुप्रीम कोर्टाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

शिवसेनेने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी पत्र दिल्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असतानाही बहुमत चाचणी का घेतली जात आहे? असा आक्षेप शिवसेनेकडून घेण्यात आला होता. मात्र त्यावेळीही सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत ११ जुलैला सुनावणी होईल असं सांगितलं होतं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

SCROLL FOR NEXT