Maharashtra political crisis: MNS/BJP Saam TV
मुंबई/पुणे

उद्याच्या बहुमत चाचणीसाठी राज ठाकरेंच्या मनसेचा भाजपला पाठिंबा

विधानसभेचं एक दिवसाचं खास अधिवेशन उद्या गुरुवारी बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारची बहुमत चाचणी घेण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार आता विधानसभेचं एक दिवसाचं खास अधिवेशन उद्या गुरुवारी बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Goverment) भवितव्याचा फैसला होणार असून या बहुमत चाचणीसाठी मनसेने आपला पाठिंबा भाजपला दिल्याची माहिती समोर येत आहे.

आघाडी सरकारवरील अविश्वास दर्शक ठराव पास करण्यासाठी भाजपने मोठी रणनितीआखली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बंडोखोर आमदारांसह त्यांनी अपक्षांना देखील आपल्या बाजूने वळविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे भाजपला आणि सत्ताधारी आघाडीला देखील एका एका आमदाराचे मत मोलाचे ठरणार आहे.

हे देखील पाहा -

अशातच मागील राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपलाच सपोर्ट करणारे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत उद्या देखील भाजपला मिळणार आहे. कारण मनसेच्या पाठिंब्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnsvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला होता. शिवाय राज ठाकरे यांनी देखील आपण भाजपलाच सपोर्ट करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील भाजपच्या बाजूने असणार आहेत.

दरम्यान, उद्याच्या बहुमत चाचणीसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट उद्या मुंबईत येणार असून त्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी विमानतळ परिसरात उपस्थित राहण्याचे आदेश देखील भाजपने दिले आहेत. त्यामुळे उद्याची बहुमत चाचणी राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक अशी ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत आशिष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT