Maharashtra Political Crisis News| Uddhav Thackeray Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

'मी पुन्हा येईल असं म्हणालो नव्हतो'; राजीनामा देताना मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: आज फेसबुक लाईव्हद्वारे आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं सांगितलं.

Jagdish Patil

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असणारा सत्तासंघर्ष आणि महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे टिकणार की कोसळणार याबाबतच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने आता पुर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं सांगितलं.

मात्र, यावेळी त्यांनी मी पुन्हा येईल अस बोललो नव्हत, असं म्हणत भाजपनेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) नाव न घेता टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्ही मुंबई आणि हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्यांसमोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या, मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते पूजा हवी आहे.

हे देखील पाहा -

माऊली म्हणतील ते मान्य आहे. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि‌ मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे, तसंच माझ्यापासून कोणी शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'मी मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा देत आहे. 'मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो.' सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

तसंच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला मुख्यमंत्री म्हणाले, 'अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे असं म्हणत त्यांनी बंडखोरांवरही निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

SCROLL FOR NEXT