Devendra Fadnvis, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political updates Live : महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणे हेच आमचे उद्दीष्ट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणे हेच आमचे उद्दीष्ट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. तसेच प्रलंबीत प्रश्नांना पुढे घेवून जाणार. देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनायचं नव्हतं. पण पक्षाचा आदेश आला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहे. जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प मार्गी लावू. रखडलेल्या प्रकल्पांना वेग देणार आहे. माजी मुख्यमंत्रीही सोबत त्यामुळे जोरदार बॅटिंग होईल. जनतेला अपेक्षित असलेली कामं करणार, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची कल्पना नव्हती - शरद पवार

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वी ईडीचं नाव सुद्धा माहित नव्हतं. पण आता खेड्या पाड्यात ईडी माहित झाली आहे. महाविकास आघाडी कमी पडली असं वाटत नाही. ईडीद्वारे आता विरोधकांना नोटीस पाठवली जाते. २००४ ते २०२० च्या निवडणुकीबाबत आता आयकरच्या नोटिसा येत आहेत. आयकारच्या कारभारात गुणात्मक वाढ झाल्याचं दिसतंय. मला आता आयडीकडून नोटीस आली आहे. शिवसेना संपुष्टात आली नाही आणि येणारही नाही. केंद्रातल्या अदृष्य शक्तींचा वापर होत आहे. आगामी निवडणुका महाविका आघाडी म्हणून लढण्यावर अजून निर्णय नाही. निवडून आलेले फक्त पाच वर्षांसाठी, पक्ष कायमचा असतो.

२ किंवा ३ जुलैला विशेष अधिवेशन

२ किंवा ३ जुलैला विशेष अधिवेशन होणार असल्याची शक्यता आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत विश्वासदर्शक ठरावाबाबत चर्चा झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केलं मनापासून अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसे शुभेच्छा

ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे. हिंदुत्व आणि महाराष्ट्र हितासह ठाणे जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास होईल या अपेक्षांसह श्री.एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनसे अभिनंदन व शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर प्रोफाईल फोटो बदलला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला फोटो शिंदे यांनी ट्विटरवर प्रोफाईल म्हणून ठेवला आहे. 

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डांसह फडणवीसांचे मानले आभार

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

पुण्यात शिंदे समर्थकांचा जल्लोष

पुण्यात एकनाथ शिंदे समर्थकांचा जल्लोष

पेढे वाटत शिंदेंच्या समर्थकांनी केला आनंद साजरा

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ घातला होता

बंडखोर आमदार म्हणून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोला याच कार्यालयात काळे फासले होते

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे केले अभिनंदन

एकनाथ शिंदे हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज, गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे यांना भाजपचे संपूर्ण समर्थन असेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस यांनी सांगितले. ते आज संध्याकाळी एकटेच शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतली भेट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनकडे रवाना झाले, आज संध्याकाळी शपथविधी होणार

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल

एकनाथ शिंदे थेट गोव्याहून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिंदे हे कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचले असून हे दोन्ही नेते आता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde met Devendra Fadnavis At Sagar in Mumbai

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे रवाना

मागील अनेक दिवसांपासून राज्याबाहेर असणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. सागर बंगल्यावरून ते राजभवनावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आजच शपथ घेण्याची शक्यता - सुत्र

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज मुंबईत आले असून शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. शिवाय हे दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आजच घेण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतं आहे.

एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचले

'असा' असेल नवीन सरकार स्थापनेचा कार्यक्रम

१ तारखेला शपथविधी होणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथ घेतील.

राज्यपालांसोबत छोटेखानी कार्यक्रम असेल.

२ जुलै रोजी अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी तात्पुरता अध्यक्ष नेमला जाईल. त्यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांची निवड केली जाईल. त्यापाठोपाठ विश्वासदर्शक प्रस्ताव येईल.

३ जुलै रोजी पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी असणार, तोही सोहळा साधेपणाने होईल.

आज आणि उद्या खाते वाटप सांगितले जाईल.

१२ जणांना कॅबिनेट मंत्रिपदे, दहाच्या आसपास राज्यमंत्री असतील.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवणार- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी गोवा येथील विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. ते मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केलं नाही, एकनाथ शिंदे गटाचं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केलं नाही. राजीनाम्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केलं असं वृत्त चुकीचं होतं, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे गटाच्या वतीने प्रवक्ता दीपक केसरकर यांनी दिलं. जे समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर युती करायची होती. आम्हाला मनातून दुःख झालं आहे, त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे, असंही केसरकर म्हणाले.

... तोपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होणार नाही: विजय वडेट्टीवार

१६ आमदारांना उपसभापतींनी दिलेली नोटीस जिवंत

११ जुलैपर्यंत त्यांना खुलासा द्यावाच लागणार

तोपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होणार नाही असं माझं मत

सर्वधर्मसमभाव ही काँग्रेसची भूमिका

नामकरण मुद्द्यांवर थोडीफार नाराजी

मात्र त्यांना समजावून सांगणार

संभाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी आदरणीय

एकनाथ शिंदे गोव्यावरून मुंबईसाठी रवाना

गोवा येथील हॉटेलमधून एकनाथ शिंदे एअरपोर्टकडे रवाना झाले आहेत. तेथून ते मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मिळते.

काँग्रेस नेत्यांची विधानभवनात बैठक

काँग्रेस नेत्यांची विधानभवनात बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

महाराष्ट्रात नवं सरकार येणार, पुन्हा एकदा...; किरीट सोमय्यांचं ट्विट

महाराष्ट्रात नवीन सरकार येणार, पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल या मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ट्विट

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे ट्विट, काय म्हणाले वाचा!

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत बैठक होणार

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिपद वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे, या बैठकीसाठी एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

बंडखोरांना धुणी भांडीच करावी लागणार; संजय राऊतांचा हल्लाबोल

बुधवारी उशीरा रात्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांवर हल्लाबोल चढवला. बंडखोरांना धुणी भांडीच करावी लागणार अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे 'फ्लोअर टेस्टची गरज नाही'; विधानमंडळ प्रधान सचिवांची माहिती

उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता फ्लोअर टेस्टची गरज नाही, असं महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार सर्व आमदारांना सांगितले.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची होणार चर्चा ; मंत्रीमंडळाचे चित्र होणार स्पष्ट

बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारपर्यंत नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी १० वाजता भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे.

शिंदे गटातील नेत्यांना मिळणार मंत्रिपदी बढती

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते. या बंडात महाविकास आघाडीमध्ये मंत्री असणारे नेत्यांनीही बंड केले होते, यात शिवसेना (ShivSena) नेते शंभूराजे देसाई यांनीही बंड केले होते. आणि अपक्ष असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही बंड केले होते. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सीटी रवी हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सरकारच्या शपथविधी संबंधी चर्चा हेणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना पुढील आदेश मिळेपर्यंत मुंबईतच राहण्यास सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT