Eknath Shinde News, Shivsena Political Crisis News Saam TV
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे आक्रमक, न्यायालयीन लढाई लढणार, मुंबईला आल्यावर कळेलच

लोकशाहीत बहुमत आणि आकड्यांना महत्व असतं. जे अल्पमतात असतात त्यांना गटनेता बदलता येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबंई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सेनेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शिंदे यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. शिवाय या सर्व प्रकरणाबीबत आपण न्यायालयीन लढा देणार असल्याचंही शिंदे (Eknath Shinde) यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

शिंदे यांना त्यांच्यावरती केलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'अल्पमतात असलेल्या गटनेत्याला व्हीप काढता येत नाही. दोन तृतीयांश संख्याबळ असल्याचं पत्र आम्ही उपाध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं निलंबन करणे बेकायदेशीर होईल. तसंच लोकशाहीत बहुमत आणि आकड्यांना महत्व असतं. जे अल्पमतात असतात त्यांना गटनेता बदलता येत नाही. शिवाय आता जे गटनेता बदलण्याचं काम केलं आहे ते देखील बेकायदेशीर (Illegal) असल्याचं शिंदे सामशी बोलताना म्हणाले

हे देखील पाहा -

तसंच शिवसेना (Shivsena) गटनेता बदलण्यासाठी सर्व सदस्यांना बोलवून बहुमताने गटनेता ठरवायचा असतो. तसंच बहूमत असेल तरच गटनेता बदलता येतो. आता बदलण्यात आलेल्या गटनेतापदाची प्रक्रियाच बेकायदेशीर असून जो व्हीप काढला आहे तो देखील कायदेशीर नाही असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय शिंदे यांचा गट अस्तित्वात येत नाही, तुम्ही स्थापन केलेल्या गटाला काही अर्थ राहणार नाही असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. यावर प्रश्न विचारला असता के म्हणाले, 'आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली आहे. शिवाय आम्ही कालच गट स्थापन केला असून दोन तृतीयांश सदस्यांचे सख्याबळ असल्याचं पत्र उपाध्यक्षांना दिलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी नियमानुसार निर्णय घेणे आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, शिंदे यांना अजय चौधरी यांना सेनेकडून गटनेतेपदी निवड केल्याचं सांगितलं असता ते म्हणाले, आमच्याकडे बहुमत आहे. अॅफिडेविड केलं आहे, सगळे सोबत आहेत. आम्हाला देखील याबाबत न्यायालयीन लढाई किंवा निर्णय घ्यावा लागेल. खोट्या आकडेवारीवर निर्णय घेत असतील तर आम्ही न्यायालयीन लढाई लढवणार. शिवाय पक्षाच्या चिन्हाबाबतचा अजून कोणताही निर्णय झाला नसून याबाबतचा निर्णय बैठकीनंतर कळवणार असल्याचही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शरद पवारांना उत्तर देणार....वळसे-पाटील

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

Maharashtra politics :आधी बॅगा आता कारची तपासणी, उद्धव ठाकरेंच्या तपासणीवरुन राजकारण शिगेला

शिवाजी पार्कावर मोदींची तोफ धडाडणार, मराठवाड्यातही मोदींचा आवाज घुमणार, ठाकरेंवर काय बोलणार

SCROLL FOR NEXT