Raj Thackeray and Uddhav Thackeray during a joint press conference  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Maharashtra Political News Snajay Raut On Raj Thackearay : राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी होणार का? राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद सुरू

  • ४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या निर्णयांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा

  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्याने ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकेची चर्चा पुन्हा सुरू

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्रित राजकीय भूमिकेची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज सकाळी साडेअकरा वाजता ‘शिवतीर्थ’ येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचा संवाद सुरु आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मागील दहा महिन्यांत इतर दोन निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या सूचना कथितरीत्या 14 वेळा नाकारल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले असून, आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

याच मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या पक्षांनी एकत्र येत ४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाचं विधान केलं. “४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा असेल. शिवसेना आणि मनसेने पुढाकार घेतला आहे,” असं राऊत यांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी या आंदोलनात एकत्र सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, पत्रकारांनी राज ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार का, तसेच मनसे इंडिया आघाडीसोबत आहे का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राऊत यांनी, “इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणूक आयोग हा विषय असेल. राज ठाकरे हा विषय नाही. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे. का असू नये संवाद?” असं सूचक उत्तर दिलं. राऊत यांच्या या विधानामुळे राज ठाकरे आणि इंडिया आघाडी यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. मात्र, राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

Pitru Paksha : ना कांदा, ना लसूण; पितृपक्षात बनवा 'ही' झणझणीत रस्सा भाजी

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Vinod Kambli: मुंबईतल्या पॉश एरियात आलिशान घर, तरीही विनोद कांबळी वृद्धाश्रमात का राहतो?

Kidney disease symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं ५ इशारे; साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल भारी

SCROLL FOR NEXT