Ashok Kharat Case Update  Saam tv
मुंबई/पुणे

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ मोबाईलमधून पटकन डिलीट करा; आता शेअर करणाऱ्यांना थेट अटक होणार

Ashok Kharat Case Update : पीडित महिलांचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. आता शेअर करणाऱ्यांना थेट अटक होणार आहे.

Akshay Badve

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात पोलिसांचा कडक इशारा

आता पीडितांचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांना अटक होणार

नगरमध्ये आधीच तिघांवर गुन्हा नोंद

अशोक खरात प्रकरणातील दोषींवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. नाशिकमधील या नराधमाने शेकडो महिलांवर अत्याचार केले असून त्यांचे काही सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने काहींनी कारवाईची मागणी देखील केली होती. त्यानंतर या प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. पीडित महिलांचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांना थेट अटक होणार असल्याचे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने स्पष्ट केलं आहे.

अशोक खरात प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढला आहे. या प्रकरणातील विशेष पथकाकडून आरोपी अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे. अशोक खरातशी संबंधित लोकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती देखील करण्यात आली. तसेच त्याच्या फार्महाऊसवरून लॅपटॉपमधील सीसीटीव्ही व्हिडिओ जप्त केले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल केले आहेत. आता विशेष तपास पथकाने पीडितांचे व्हिडिओ शेअर केल्यास थेट अटक होणार असल्याचा इशारा दिला आहे.

...तर ग्रुप 'अॅडमिन'ला अटक होणार

नाशिक प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ शेअर केल्यास थेट अटक होणार आहे, अशी माहिती पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, न्यूज चॅनल्स, पोर्टल्स यांना पत्राद्वारे दिली. सोशल मीडियावर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केले जात असल्याने विशेष तपास पथकाने कारवाईचा निर्णय घेतला. अश्लील व्हिडीओ शेअर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संबंधित ग्रुप अॅडमिन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाईल, असा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT